सचिन तेंडुलकरने पोस्टाला मिळवून दिले ६० लाख रुपये, Post Rs 60 lakh given by Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकरने पोस्टाला मिळवून दिले ६० लाख रुपये

सचिन तेंडुलकरने पोस्टाला मिळवून दिले ६० लाख रुपये
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय टपाल विभागाला आपल्या जादुई नावाने ६० लाख रूपयांची कमाई करून दिली आहे. पोस्टाने सचिनचे पोस्ट तिकिट काढले होते. सचिनच्या तिकिटातून ६० लाख रूपये मिळालेत.

नागपूर विभागातून दोन लाख रूपये मिळाले. तर राज्यात मुंबई अव्वल राहिले आहे. मुंबईतून ४७ लाख रुपये, पुण्यातून १०लाख , नाशिकमधून ७० हजार रूपये प्राप्त झालेत. अन्य विभागातून जवळपास १ लाख रुपये टपाल विभागाला मिळाले आहेत.

भारतीय टपाल विभागाने काढलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे छायाचित्र असलेले स्टॅंम्प तसेच मिनिएचर शीटच्या विक्रीतून पोस्टाला तब्बल ६० लाख रुपयांची कमाई झाली. २००वा कसोटी सामना खेळून सचिनने १४ नोव्हेंबर रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या कारकिर्दीला सलाम म्हणून भारतीय टपाल विभागाने त्याच्यावर पोस्ट स्टॅम्प काढण्याचा निर्णय घेतला.

सचिनचे छायाचित्र असलेले ३० लाख १ हजार पोस्ट स्टॅम्प, २४ लाख १ हजार मिनिएचर शीट (कव्हर) आणि १६ लाख एक हजार शीटलेट (लहान कागदावर १६ स्टॅम्पचे शीट) छापण्यात आले. यात महाराष्ट्रातील टपाल विभागाच्या वाट्याला ७५ लाख रुपये किमतीचे स्टॅम्प, मिनिएचर शीट आणि शीटलेट विक्रीला आले. यातून आतापर्यंत तब्बल ६० लाख रुपयांची कमाई टपाल विभागाने केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 16:13


comments powered by Disqus