पृथ्वी शॉची रेकॉर्डब्रेक कामगिरी, एका इनिंगमध्ये ५४६ रन्स!Prithvi Shaw`s record, 546 runs in Harris

पृथ्वी शॉची रेकॉर्डब्रेक कामगिरी, एका इनिंगमध्ये ५४६ रन्स!

पृथ्वी शॉची रेकॉर्डब्रेक कामगिरी, एका इनिंगमध्ये ५४६ रन्स!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्प्रिंगफिल्ड विरुद्ध सेंट फ्रान्सिसि डी अॅसिसि या 'हॅरिस शिल्ड'च्या मॅचमध्ये पृथ्वी शॉ नावाच्या युवा क्रिकेटपटूनं चांगलंच धुमशान घातलं. आपल्या शानदार बॅटिंगच्या जोरावर हॅरिस शिल्डमध्ये पृथ्वी शॉनं ५४६ रन्स करत ऐतिहासिक कामगिरी केली.

पृथ्वीनं अरमान जाफरचा ४७३ रन्सचा रेकॉर्ड मोडीत काढला. तर ‘गाईल्स शिल्ड’मध्ये सरफराज खाननं केलेल्या ४९८ रन्सलाही त्यानं मागं टाकलंय.

पृथ्वीनं नॉटआऊट २५७ रन्सवरुन आज पुढं खेळण्यास सुरुवात केली आणि त्यानं सेंट फ्रान्सिसच्या बॉलर्सची यथेच्छ धुलाई केली. मुंबईचा १४ वर्षीय पृथ्वी शॉ हा रिझवी शाळेचा विद्यार्थी आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 20, 2013, 14:50


comments powered by Disqus