मुंबई टेस्टमध्ये पुजाराची झुंजार सेन्चुरी, pujara hits century again in mumbai test match

मुंबई टेस्टमध्ये पुजाराची झुंजार सेन्चुरी

मुंबई टेस्टमध्ये पुजाराची झुंजार सेन्चुरी
www.24taas.com, मुंबई

टीम इंडियाचा युवा बॅट्समन चेतेश्वर पुजाराने मुंबई टेस्टमध्ये झुंजार सेंच्युरी झळकावली आहे. टेस्ट करिअरमधील त्याची ही तिसरी सेंच्युरी ठरली. तर या सीरिजमधील पुजाराची ही दुसरी सेंच्युरी ठरलीये.

एकीकडे दिग्गज बॅट्समन अपयशी ठरत असतांना पुजारानं एक बाजू लावून धरत टीम इंडियाचा स्कोअर बोर्ड हलता ठेवला. त्याच्या सेंच्युरीमुळेच भारतीय टीमला २०० चा टप्पा गाठता आला. पुजारा मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाचा तारणहार ठरलाय. पुजारानं अहमदाबाद टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावल्यानंतर मुंबई टेस्टमध्ये झुंजार सेंच्युरी झळकावलीय...

First Published: Friday, November 23, 2012, 16:15


comments powered by Disqus