पुणे वॉरियर्स आयपीएलमधून आऊट, Pune Warriors out from IPL

पुणे वॉरियर्स आयपीएलमधून आऊट

पुणे वॉरियर्स आयपीएलमधून आऊट
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुणे वॉरियर्सचं आयपीएलमधील अस्तित्व संपुष्टात आल आहे. बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीने पुणे वॉरियर्सच कॉन्ट्रॅक्ट रद्द केल आहे. यामुळे आता आयपीएल 2014मध्ये एकूण 8 टीम्सचाच सहभाग असणार आहे.

तब्बल 174 कोटी रुपयांची बँक गॅरंटी न भरल्यामुळे पुणे वॉरियर्सच कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे वॉरियर्सचे फ्रंचाईजी असलेल्या सहारा ग्रुपला बँक गॅरंटी भरण्याबाबत बीसीसीआयकडून अनेकदा सांगण्यात आल. मात्र, तरीही सहारा ग्रुपने बँक गॅरंटी न भरल्याने अखेर बीसीसीआयने पुणे वॉरियर्सच कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला.


http://bit.ly/17kFAZH

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, October 26, 2013, 23:53


comments powered by Disqus