सचिनवर दबाव टाकू नका - लारा, Put pressure on Sachin wrong - Lara

सचिनवर दबाव टाकू नका - लारा

सचिनवर दबाव टाकू नका - लारा
www.24taas.com,कोलंबो


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पारितोषिक वितरण समारंभात ब्रायन लारा हे मत व्यक्त केले. सचिनचे वय झाले आहे. त्यांने निवृत्ती घ्यावी, अशी चर्चा असताना ब्रायन लारा त्याच्या मदतीला धावून आला आहे. सचिनला निवृत्तीला भाग पाडू नका, त्याला निवृत्ती कधी घ्यावी हे माहीत आहे, असे लारा म्हणाला.

सचिन हा केवळ भारतीय क्रिकेटचा नव्हे तर जागतिक क्रिकेटचा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्याला निवृत्ती घेण्यास कुणी भाग पाडू नये. तो एक उत्कृष्ट खेळाडू आणि व्यक्ती आहे. मी त्याचा क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही आदर करतो, असे लाराने म्हटले.

First Published: Sunday, September 16, 2012, 14:52


comments powered by Disqus