राहुल द्रविडच्या वडिलांचे निधन, rahul dravid father passes away

राहुल द्रविडच्या वडिलांचे निधन

राहुल द्रविडच्या वडिलांचे निधन
www.24taas.com, झी मीडिया, बंगळूर

भारताची ‘द वॉल’ अशी ओळख असणारा माजी कसोटीपटू आणि कॅप्टन राहुल द्रविड याला पितृशोक झालाय. त्याचे वडील शरद द्रविड यांचे वयाच्या ७९व्या वर्षी बंगळुरू येथील राहत्या घरी बुधवारी सायंकाळी निधन झाले

आज गुरूवारी सकाळी शरद द्रविड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शरद द्रविड यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगे. सुना, नातवंडे आहेत.

सौरव गांगुलीच्या अनुपस्थितीत त्याने कर्णधार पदाचीही भूमिका बजावलीय. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याच्या नावे अनेक रेकॉर्ड आहेत. ‘द वॉल’ राहुल द्रविडने टीम इंडियाच्या विजयात अनेक वेळा मोलाचे योगदान दिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 4, 2013, 11:41


comments powered by Disqus