Last Updated: Wednesday, August 7, 2013, 07:38
www.24taas.com, झी मीडिया, मॅनचेस्टरऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेसमधील तिसरी टेस्ट पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर ड्रॉ झाली.
ही टेस्ट ड्रॉ झाल्यानं ऍशेस आता इंग्लंडकडेच राहणार आहे. इंग्लंडला तीनशेहून अधिक रन्सचं टार्गेट होतं. ऑस्ट्रेलियानं इंग्लिश टीमच्या तीन बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं.
मात्र, पावसाचा व्यत्यय आला आणि ऑस्ट्रेलियाचे सारिजमध्ये कमबॅक करण्याचे मनसुबे धुळीस मिळाले. या मॅचमध्ये कांगारुंचं वर्चस्व होतं.
मात्र, पावसामुळे त्यांची सारी मेहनत पाण्यात गेली. आता चौथ्या सेटमध्येही अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास क्लार्क अँड कपंनी अतूर असेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 6, 2013, 19:38