राजस्थान रॉयल्सला १०० कोटी रुपयांचा दंड , Rajasthan Royals slapped with Rs 100 cr fine by ED

राजस्थान रॉयल्सला १०० कोटी रुपयांचा दंड

राजस्थान रॉयल्सला १०० कोटी रुपयांचा दंड
www.24taas.com,नवी दिल्ली

आयपीएलची बोली कालच लागली होती. कोणत्या खेळाडूला कोटीचा भाव आला असताना आज आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या टीमला १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने परकीय चलनातील गैरव्यवहारामुळे ही कारवाई केली आहे. ईडीने फेमा कायद्याअंतर्गत शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या `जयपूर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड` दणका दिला आहे.

राजस्थान रॉयल्स टीमने परकीय चलन व्यवहार करताना गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट झालं होतं. तसंच काही व्यवहार हे कंपनीची स्थापना होण्यापूर्वीच झाल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे ईडीने २०११ मध्ये राजस्थान रॉयल्सला नोटीसही पाठवली होती.

५० कोटी हे राजस्थान रॉयल्स आणि त्यांचे भागीदार यांनी भरायचे आहेत. तर ३४ कोटी ईएम स्पोर्टिंग होल्डिंग, मॉरिशस आणि त्यांचे भागीदार, तसंच १४.५ कोटी रुपये मे. एनडी इन्व्हेस्टमेंट, युके आणि त्यांच्या भागीदारांनी भरायचे आहेत.

First Published: Monday, February 4, 2013, 17:29


comments powered by Disqus