Last Updated: Monday, May 26, 2014, 14:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईएका कंडोम कंपनीने आयपीएलच्या निमित्त साधून 20-20 पॅक बाजारात उतरवला आहे. आयपीएलच्या सिझनमध्ये या कंपनीनं चांगलीच मार्केटिंग केली आहे.
कुणालाही वाटेल की आयपीएल आणि कंडोम्सचा काय संबंध पण मार्केटिंगने हे तंत्र व्यवस्थित साधलं आहे.
आयपीएलमधील 20-20 शब्द वापरून या कडोम कंपनीने नवा कंडोम पॅक बाजारात आणला आहे.
कंडोम खरेदीसाठी बोलताना कंडोम, निरोधसारखे शब्द वापरतांना ग्राहक लाजतात, म्हणून एक 20-20 पॅक द्या असा सोयीचा शब्द या जाहिरातीत प्रमोट करण्यात आला आहे.
आयपीएलचा सिझन व्यवस्थित साधल्याने या कंडोम कंपनीला किती फायदा झाला आहे, हे कंडोम कंपनीच सांगू शकते.
पण जगात आता काहीही विकायचं असेल, तर एक मार्केटिंग नीती महत्वाची आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 26, 2014, 12:11