निवृत्तीनंतरचं आयुष्य इतकंही वाईट नाही, सचिनचा कॅलिसला सल्लाRetired life isn`t so bad, Tendulkar to

निवृत्तीनंतरचं आयुष्य इतकंही वाईट नाही, सचिनचा कॅलिसला सल्ला

निवृत्तीनंतरचं आयुष्य इतकंही वाईट नाही, सचिनचा कॅलिसला सल्ला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या सचिननं दोन दिवसांपूर्वी निवृत्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सच्चा चॅम्पियन’म्हणत ज्यानं नेहमी खेळाला खेळासारखाचा खेळलं, या शब्दात कॅलिसचं कौतुक केलंय.

सचिन तेंडुलकरनं मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. कॅलिसच्या अकाऊंटवर ट्वीट करुन सचिननं त्याला शुभेच्छा दिल्यात. सोबत हे ही सांगितलं की, निवृत्तीनंतरचं जीवन इतकंही काही वाईट नाहीय.

जॅक कॅलिस एक ऑलराऊंडर क्रिकेटपटू असून त्यानं १८ वर्षांच्या आपल्या शानदार करिअरमध्ये टेस्ट क्रिकेटला अलविदा केलं. डर्बन टेस्टमध्ये १० विकेटनं भारताला हरवून कॅलिसला आफ्रिकन टीमनं विजयी सलामी दिली.

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त रन्स करणारा जॅक कॅलिस जगातला तिसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू ठरलाय. ३८ वर्षीय कॅलिसनं १६६ टेस्ट मॅचेसमध्ये १३,२८९ रन्स केले. या यादीत पहिल्यानंबरवर सचिन तेंडुलकर १५,९२१ आणि दुसऱ्या नंबरवर रिकी पॉन्टिंग १३,३७८ आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 31, 2013, 16:55


comments powered by Disqus