पॉन्टिंगने सोडला नाही सचिनचा पिच्छा, Ricky Ponting hits ton, equals Sachin Tendulkar`s first-class record

पॉन्टिंगने सोडला नाही सचिनचा पिच्छा

पॉन्टिंगने सोडला नाही सचिनचा पिच्छा
www.24taas.com, झी मीडिया, लंडन
माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शनिवारी कौंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सरे या संघाकडून आपले ८१ वे शतक ठोकताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली.

डर्बीशायर संघाविरुद्ध १९२ धावांची धडाकेबाज खेळी करणार्यां पाँटिंगने हे प्रथमश्रेणीतील ८१ वे शतक ठोकले. या शतकाबरोबरच पाँटिंगने सचिनच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील ८१ शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.

या सामन्याआधी रिकी पाँटिंगने २८७ सामन्यांत ८१ शतकांसह ५५.२७ च्या सरासरीने २३ हजार ८४९ धावा प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये केल्या आहेत, तर सचिनच्या नावावर ३०७ सामन्यांत ८१ शतकांसह २५ हजार २२८ धावा आहेत. विशेष म्हणजे गावसकरच्या नावावरही ८१ शतके आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 3, 2013, 11:29


comments powered by Disqus