रॉबिन उथप्पाच्या वडिलांनी मारले आईला, गुन्हा दाखल robin uthappa`s father bitting her wife

रॉबिन उथप्पाच्या वडिलांनी मारले आईला, गुन्हा दाखल

रॉबिन उथप्पाच्या वडिलांनी मारले आईला, गुन्हा दाखल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

क्रिकेटर रॉबिन उथप्पाचे वडील वेनू उथप्पा यांच्यावर आपल्या पत्नीवरच अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोबतच उथप्पाच्या दोन नातेवाईकांवर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोडागुच्या पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला गेलाय.

कोडागुचे पोलीस अधीक्षक अनुचेथने सांगितलं की, `आम्ही रॉबिन उथप्पाच्या वडिलांसोबत तीन लोकांना अटक केली आहे. यांच्यावर वेनू उथप्पांची पत्नी रोजलीन उथप्पा हिच्यावर अत्याचार करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यासोबतच उथप्पांचे नातेवाईक केल्विन वर्गीज आणि त्यांची पत्नी मंजूश्री यांना देखील अटक करण्यात आली आहे. केल्विन वर्गीज आणि मंजूश्री हे वेनूच्या घरीच राहायला आले होते. या वेळी त्यांनी रॉबिन उथप्पाच्या आई सोबत भांडण करून तीला मारहाण केली.

सध्यातरी वेनू उथप्पा आणि त्यांच्या नातेवाईकांवर भारतीय दंड संहिता कलम ४९८-ए तसेच कलम ५०६ च्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात महिलेला पतिकडून किंवा त्याच्या नातेवाईकांकडून मारहाण आणि अपराधीक धमकी देण्याचा आरोप ठेवण्यात येतो.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 1, 2014, 21:02


comments powered by Disqus