स्पॉट फिक्सिंगचा आरोपी श्रीसंतचं १२ डिसेंबरला लग्न!S Sreesanth to tie knot on December 12

स्पॉट फिक्सिंगचा आरोपी श्रीसंतचं १२ डिसेंबरला लग्न!

स्पॉट फिक्सिंगचा आरोपी श्रीसंतचं १२ डिसेंबरला लग्न!
www.24taas.com, वृत्तसंस्था, कोच्ची

भारतीय संघात राहिलेला तेज गोलंदाज एस. श्रीसंत लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. तशी माहितीच श्रीसंतची आई सावित्री देवी यांनी दिलीय.

श्रीसंत राजस्थानमधील राजसी परिवारातील नयन हिच्या सोबत लग्न करणार आहे. श्रीसंत आणि नयन यांचा विवाह सोहळा येत्या १२ डिसेंबरला, गुरूवायपूर इथल्या श्रीकृष्ण मंदिरात पार पडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीसंत आणि नयन यांच्यात खास मैत्री आहे.

श्रीसंतवर आयपीएलच्या सहाव्या मौसमात स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. आयपीएलमध्ये श्रीसंत राजस्थान रॉयल्स संघातून खेळत होता. १६ मे २०१३ रोजी त्याला अन्य दोन खेळाडूंसह पोलिसांनी त्याला अटकही केली होती. काही काळ श्रीसंतला जेलमध्ये राहावं लागलं होतं.

त्यानंतर तो सध्या जामीनावर बाहेर आला. अशा परिस्थितही नयननं श्रीसंतची साथ सोडली नाही. त्याच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहीली. त्याला दिलासा देण्याचं आणि सावरण्याचं काम तिनं केलं. १२ डिसेंबरला लवकरच हे दोघं विवाहबद्ध होतील.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 19, 2013, 14:46


comments powered by Disqus