Last Updated: Tuesday, February 25, 2014, 14:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईभारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आर्शीवाद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. सचिन आणि लता मंगेशकर यांच्यातील अतूट नातं सर्वांनाच परिचीत आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिननं याच नात्याची जाण ठेवत लतादीदींना त्यांच्या घरी जावून सदिच्छा भेट घेतली. यावेळी सचिन आपली पत्नी अंजलीसह लतादीदीच्या घरी गेला होता. लता मंगेशकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून फोटो अपलोड करत, ही माहिती दिली. त्यांने आपल्या भेटीचे तीन फोटो अपलोड केले आहेत. खूप दिवसांनी सचिन-अंजली भेटले आहेत. दोघेही खूप छान दिसत होते, असा लतादिदींनी म्हटलंय.
लतादिदी यांनी सचिनला भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणीही केली होती. त्यांची मागणी पूर्ण झाल्याने ललादिदी खूप खूश आहेत. भारतरत्न मिळाल्यानंतर सचिनची भेट त्यांच्यासाठी खास होती. सचिन आणि अंजलीनं दिलेल्या भेटीनं आपण खूप खुश असल्याचं यावेळी लतादीदींनी सांगितलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 25, 2014, 14:59