Last Updated: Thursday, September 13, 2012, 16:37
www.24taas.com, नवी दिल्ली
न्यूझीलंडविरुद्ध ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर सलग तीनदा ‘क्लीन बोल्ड’ झाला अन् सचिनचं वय झालंय, त्याने निवृत्त व्हावं अशी ‘कोल्हेकुई’ सुरू झाली. आता यात पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यानेही तोंड घातलंय.
निवड समितीच्या दयेवर संघात राहण्यापेक्षा सचिनने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी, असा सल्ला इम्रानने सचिनला दिला आहे.फलंदाजातील जवळजवळ सर्व विक्रम सचिनच्या खात्यात जमा असून आता तो विक्रम वगैरे गोष्टींच्या पुढे गेलाय.
अप्रतिम रेकॉर्ड त्याच्या नावावर असताना त्याने आपल्या प्रतिभेला, दर्जाला न साजेसा खेळ करीत संघात जागा अडवून बसणे योग्य नाही, असे इम्रान म्हणाला. सचिनसारख्या खेळाडूने ‘टॉप’वर असतानाच निवृत्त व्हायला हवे. तुम्ही कां निवृत्त होत नाही, अशी वेळ सचिनवरच काय कोणत्याही महान खेळाडूवर येऊ नये.
First Published: Thursday, September 13, 2012, 16:05