सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रे्लियाने गौरविले, Sachin Tendulkar be conferred the award of Australia

सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रे्लियाने गौरविले

सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रे्लियाने गौरविले
www.24taas.com,मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रे्लिया सर्वोच्च नागरिक किताब देऊन गौरविण्यात आले. सचिनला `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हा पुरस्कार ऑस्ट्रेीलियाचे क्षेत्रीय कला मंत्री साइमन क्रिन यांनी मुंबईत एका कार्यक्रमात प्रदान केला.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलियन गिलार्ड या भारतीय दौ-यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी सचिनला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज सचिनला सन्मानित करण्यात आले. सचिन हा दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी माजी अटार्नी जनरल सोली सोराबजी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोराबजी यांना २००६ मध्ये ‘ऑस्ट्रेलिया- भारत द्विपक्षीय संबंधाबाबत’ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’चे मानद सदस्य बनविले होते.

दरम्यान सचिनला हा पुरस्कार देण्याबाबत ऑस्ट्रेलियात काहीजणांनी टीका केली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने सचिनला पुरस्कार जाहीर झाल्याने तीव्र विरोध दर्शवला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या एका खासदारानेही सचिनला पुरस्कार देण्याला विरोध केला होता.

हा पुरस्कार मिळणारा दुसरा क्रिकेटपटू आहे. या आधी वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याला गौरविण्यात आले होते. २००९मध्ये सन्मानित करण्यात आले होते.

First Published: Tuesday, November 6, 2012, 17:55


comments powered by Disqus