Last Updated: Wednesday, October 17, 2012, 08:51
www.24taas.com, नवी दिल्ली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी आज सकाळी `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हे मानद सदस्यत्व देण्याची घोषणा केल्यानंतर क्रिकेटविश्वात आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, ही घोषणा ऑस्ट्रेलियातील नागरिकांना रुचली नाही. त्यामुळे कांगारू चांगलेच भडकले आहेत.
`ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हे मानद सदस्यत्व सन्मान मिळविणारा सचिन हा दुसरा भारतीय आणि तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. मात्र गिलार्ड यांनी घोषणा करताच ट्विटरवर जबरदस्त विरोध होत आहे.
ऑस्ट्रेलियातील नागरिकांना याचा राग आहे की, सायमंड्स आणि हरभजन यांच्यात जे `मंकीगेट` प्रकरण झाले होते, त्यात सचिन तेंडुलकरचे नावही सहभागी होते. असे असताना सचिनला हा सन्मान का दिला गेला, अशी ऑस्ट्रेलियन नागरिकांचे म्हणणे आहे. सचिनने हरभजनसिंगची बाजू घेतली होती. त्याचा राग ऑस्ट्रेलियांच्या मनात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान गिलार्ड सध्या भारत दौ-यावर आहेत. आज सकाळी त्यांनी राजधानी दिल्लीत आयोजित एका क्रिकेट शिबीरात सचिन तेंडुलकरला `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हे मानद सदस्यत्व देण्याची घोषणा केली. त्यांनी दिल्लीतील दुर्बल घटकांतील तरुणांच्या क्रिकेट शिबीरात सहभाग घेतला होता.
First Published: Tuesday, October 16, 2012, 20:37