Last Updated: Thursday, April 10, 2014, 18:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई क्रिकेटचा देव म्हणुन ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर, आता मुंबई इंडियन्सचा `आयकॉन` प्लेअर म्हणून देखील ओळखला जाणार आहे. `आयपीएल` स्पर्धेतून सचिनने निवृत्ती घेतल्यानंतर मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच `आयपीएल` स्पर्धेत खेळणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी,"सचिन हा संघाचा प्रेरणास्रोत होता, म्हणुनच सचिन तेंडुलकरच्या नावाची ‘आयकॉन’ म्हणून घोषणा करत आहोत. मुंबई इंडियन्सचा आयकॉन (प्रेरणास्थान) म्हणून त्याची निवड करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
संघातील तरुण, नवोदित खेळाडूंना सचिन त्यांच्या आजूबाजूला, अनुभवाचा ठेवा घेऊन असणे हे आल्हाददायक वाटेल, तसेच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठीही ती गोष्ट आनंददायी असेल" या शब्दात सचिनची स्तूती केली.
`आयपीएल`च्या सुरुवाती पासूनच सचिन हा मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख खेळाडू होता. तो खेळाडू म्हणुनच टीमची प्रेरकशक्ती होता. गेल्या वर्षी आयपीएल जिंकून सचिनने `आयपीएल` अलविदा केला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 10, 2014, 17:09