Last Updated: Wednesday, May 28, 2014, 12:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा इयत्ता चौथीत दिसून येणार आहे, कारण इयत्ता चौथीच्या पुस्तकात सचिनची माहिती देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या, सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सचिनला आपले आई, वडील, कुटुंबीय, गुरूजन यांच्याविषयी किती आदर आहे, हे या धड्यात मांडण्यात आलं आहे.
यामुळे सचिनप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनाईतही आई-वडील, कुटुंबीय, गुरूजन यांच्याविषयी आदर वाढणार आहे.
हा धडा कोलाज या मूळ विषयावर असला, तरी सचिन हा विषय हा धड्यात प्रभावीपणे दिसून येतो.
तुम्हाला कोणत्याही विषयाखाली माहिती कशी संग्रहीत करता येईल, यासाठी `माझा आवडता क्रिकेटपटू` या नावाखाली कोलाज कसं करता येईल, याची माहिती देण्यात आली आहे.
मात्र यामुळे चौथीच्या मुलांना आपल्या आवडत्या सचिनची आणखी माहिती होणार आहे. कारण यात सचिनची छायाचित्रे, शतकं, अर्धशतकं, धावसंख्या, पुरस्कार, तसेच सचिनच्या नावावरील जागतिक विक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 28, 2014, 08:22