Last Updated: Sunday, February 23, 2014, 16:58
सचिन तेंडुलकर अभिनेता आहे की क्रिकेटर हा प्रश्न जरा विचित्र वाटत असला? तरी या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरने स्वत:ला अभिनेता म्हटलं आहे. यावरून सचिनला इनकम टॅक्समध्ये सूट मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
सचिन तेंडुलकरने २००३ मध्ये क्रिकेटमधून १९ कोटी आणि जाहिरातीतून ५.५ कोटी रूपयांची कमाई केली होती. जाहिरातीच्या अभिनयाच्या माध्यमातून मिळालेला पैशांवर सूट मिळावी म्हणून, सचिनने आपण अभिनेता असल्याचं सांगितलंय.
सचिनचा हा दावा २००८ मध्ये इनकम टॅक्स अपीलीय ट्रिब्यूनलजवळ पोहोचला. २०११ मध्ये सचिनच्या बाजूने निर्णय आला होता. यामुळे यावर आक्षेप घेणाऱ्यांना आवरतं घ्यावं लागलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 23, 2014, 16:58