सचिन तेंडुलकर तिरुपती बालाजीच्या चरणी, Sachin Tendulkar prays at Tirupati

सचिन तेंडुलकर तिरुपती बालाजीच्या चरणी

सचिन तेंडुलकर तिरुपती बालाजीच्या चरणी
www.24taas.com,तिरुपती

संपूर्ण भारतात ज्या एका देवाची मोठ्या श्रद्धेनं-भक्तीनं पूजा केली जाते आणि ज्या देवाच्या दर्शनाला जगाच्या कानाकोप-यातून भाविक येतात, त्या तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला आज क्रिकेटचा देव पोहोचला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज बालाजीचं दर्शन घेतल. पहाटे सचिननं पारंपरिक पद्धतीनं विश्वेश्वर बालाजीची मनोभावे पूजा केली.

भगवान व्यंकटेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी काल मध्यरात्री सचिन तेंडुलकर तिरुपती येथे दाखल झाला होता.पहाटे त्याने तिरुपती मंदिरात व्यंकटेश्‍वराची पूजा केली. यावेळी सुमारे २० मिनिटे तो मंदिरात होता. सचिनने पांढरे धोतर आणि शर्ट घातले होते. यावेळी त्याने सुप्रभाता रिसायटेशन सेवा यात भाग घेतला.

व्यंकटेश्‍वराचे दर्शन झाल्यावर मंदिर प्रशासनाकडून सचिन तेंडुलकरला प्रसादाचा लाडू, सिल्कचे वस्त्र देण्यात आले.

First Published: Saturday, February 2, 2013, 15:52


comments powered by Disqus