फोटोंचं मोझॅक करून साकारला सचिन, Sachin Tendulkar`s photo mosaic

फोटोंचं मोझॅक करून साकारला सचिन

फोटोंचं मोझॅक करून साकारला सचिन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सचिनच्या जगभरातल्या फॅन्सनी पाठवलेले तब्बल १७ हजार फोटो आणि त्या फोटोंचं मोझॅक करून साकारला पुन्हा एकदा सचिनच. कोणत्याही क्रिकेटपटूच्या सर्वात मोठ्या डिजिटल मोझॅकचं अनावरण सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं.

आय ऑफ ए टायगर, असं या मोझॅकला नाव देण्यात आलंय. तोशिबा कंपनीनं काही दिवसांपूर्वी वुई आर सचिन ही कॅम्पेन सोशल मीडियावर चालवली होती. त्यातून हे फोटो निवडण्यात आलेत.

जगातल्या भल्याभल्या गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणारी त्याची भेदक नजर या मोझॅकमध्ये बेमालूम साकारण्यात आलीये. त्याच्यावर तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर सचिनचा हसतमुख फोटोही या मोझॅकमध्ये दिसतोय... चाहत्यांच्या याच प्रेमानं आजवर प्रेरणा दिली, असं सचिन या निमित्तानं म्हणाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 14:18


comments powered by Disqus