सचिनच्या सन्मानसाठी समितीची स्थापना , Sachin Tendulkar to be honoured by Maharashtra state govermen

सचिनच्या सन्मानासाठी समितीची स्थापना

सचिनच्या सन्मानासाठी समितीची स्थापना
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मागील वर्षी क्रिकेटाला अलविदा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान महाराष्ट्र शासन करणार आहे.

सचिनच्या सन्मानसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा सहभाग असलेल्या सात सदस्यीय समितिची स्थापना करण्यात आली आहे.

सचिनच्या सन्मान समारंभासाठी आराखडा तयार करण्याचे काम ही समिती करणार आहे. या सन्मानासाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या या समारंभाचे आयोजन लांबणीवर पडणार आहे. सचिनचा वेळ मिळणेही आवश्यक आहे त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू असून सचिनला भेटून समारंभाचा दिनांक निश्चित करण्यात येईल.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 13, 2014, 14:07


comments powered by Disqus