मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात `विस्डेन`चा तुरा, Sachin Tendulkar : Wisden magazine, World Test team

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात `विस्डेन`चा तुरा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात `विस्डेन`चा तुरा
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

२००व्या टेस्टनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

क्रिकेटची गीता समजल्या जाणा-या विस्डेन मॅगझिनने जाहीर केलेल्या सार्वकालिक वर्ल्ड टेस्ट टीममध्ये सचिन तेंडुलकरची वर्णी लागली आहे. या टीममध्ये निवड झालेला तो एकमेव भारतीय क्रिकेटर ठरला आहे.

तसेच पाकिस्तानचा वासिम अक्रमचीही या टीममध्ये निवड झाली आहे. या दोघांव्यतिरिक्त एकाही आशियायी क्रिकेटरला या सार्वकालिक टेस्ट टीममध्ये जागा मिळवण्यात अपयश आलं आहे.

या टीमचं नेतृत्व सोपवलं गेलं आहे ते सर डॉन ब्रॅडमन यांच्याकडे. विस्डेनला यावर्षी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच विस्डेनने या सार्वकालिक वर्ल्ड टेस्ट टीमची घोषणा केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 24, 2013, 15:08


comments powered by Disqus