सानिया मिर्झा हॉटेलात, शोएब आला अडचणीत, Sania Mirza and Shoaib Malik in the hotel

सानिया मिर्झा हॉटेलात, शोएब आला अडचणीत

सानिया मिर्झा हॉटेलात, शोएब आला अडचणीत
www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंगहॅम

टीम इंडियाला पाठिंबा देणारी सानिया मिर्झा हॉटेलमध्ये शोएब मलिकबरोबर थांबल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये ठिणगी पडलेय. शोएब मलिकवर पाकमध्ये जोरदार टीका सहन करावी लागत आहे. त्याने तीन सामन्यात केवळ २५ धावा केल्याने पाक संघाचा कोचनेही टीका केली.

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये वाद सुरू आहे. हा वाद काही केल्या थांबेनासा झालाय. त्यातच भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झामुळे नव्याने पाक संघात वादाची ठिणगी पडली आहे. सानिया हॉटेलमध्ये शोएब मलिकसोबत राहिल्याने वाद निर्माण झालाय. याच हॉटेलमध्ये पाकची टीम उतरलीय होती.

या प्रकरणी सानियाचा पती आणि पाक टीमचा आघाडीचा खेळाडू शोएब मलिकवर संघ व्यवस्थापकांनी टीकेची तोफ डागली आहे. पीसीबीने खेळाडूंना पत्नीसोबत हॉटेलमध्ये थांबण्यास सक्त मनाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन करून शोएब सानियासोबत हॉटेलमध्ये थांबला. दरम्यान, कोच व्हॉटमोर यांची पत्नीदेखील याच हॉटेलमध्ये थांबली होती. सपोर्ट स्टाफच्या ज्युलियन फर्नांडोच्या मैत्रिणीचेदेखील हॉटेलमध्ये येणे-जाणे सुरू होते.


सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुमार कामगिरीमुळे शोएब मलिकवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्याने एकूण तीन सामन्यांत अवघ्या २५ धावा काढल्या आहेत. त्याने विंडीजविरुद्ध ० तर आफ्रिकेविरुद्ध ८ आणि भारताविरुद्ध १७ धावा काढल्या. त्यामुळे तो टीकेचा धनी बनलाय.

दरम्यान, टीम इंडियाला पाठिंबा देणारी सानिया भलतीच खूश आहे. पाक टीमसोबत असल्यावरही मी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली. भारताने विजय मिळवावा आणि माझ्या पतीने धावा काढाव्या, हाच माझा फंडा आहे, असेही सानियाने सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 18, 2013, 11:58


comments powered by Disqus