सेहवाग मुद्दाम खराब खेळला - धोनी , Sehwag and dhoni clash

सेहवाग मुद्दाम खराब खेळला - धोनी

सेहवाग मुद्दाम खराब खेळला - धोनी
www.24taas.com, नवी दिल्ली

सेहवाग मुद्दाम खराब खेळला हे म्हणणं आहे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याचं. त्यामुळे आता टीम इंडिया दुफळी माजण्याची शक्यता वाढली आहे. महेंद्रसिंग धोनी आणि सलामीचा फलंदाज विरेंद्र सेहवाग यांच्यातील वाद शमला असल्याचे दिसत असले, तरी वास्तविक तसे अजिबात नाही.

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत तर सेहवागने हद्दच पार केली असल्याचे धोनीने म्हटले आहे. एका वेबसाइटच्या माहितीनुसार, माझ्यासंदर्भात सेहवागचा हेतू चांगला नसल्याचे धोनीने म्हटले आहे.

तो म्हणतो की, सेहवाग टीम इंडियात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरुन माझे कर्णधारपद जाईल. ऑस्ट्रेलियात या दोघांत मोठा वाद झाला होता, त्याची बीसीसीआयला दखल घ्यावी लागली होती.

First Published: Friday, October 12, 2012, 19:07


comments powered by Disqus