भारत विरुद्ध विंडीज : सीनिअर धुरंधरांना संधी, Sehwag, Gambhir, Zaheer named in India A team against West Indies A

भारत विरुद्ध विंडीज : सीनिअर धुरंधरांना संधी

भारत विरुद्ध विंडीज : सीनिअर धुरंधरांना संधी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

वेस्ट इंडीज ‘ए` टीमविरुद्ध होणाऱ्या प्रॅक्टिस मॅचसाठी भारताची ‘ए` टीम जाहीर करण्यात आली आहे. यात फॉर्म आणि तंदुरुस्ती अभावी टीममधील स्थान गमावलेल्या क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली आहे. याशिवाय काही नवोदितांनाही ही ‘सुवर्णसंधी’ मिळाली आहे.

युवराज सिंग याच्याकडे एका मॅचसाठी कॅप्टन्सी सोपविण्यात आली आहे. याशिवाय वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, गौतम गंभीर यांचीही निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या हर्षद खडीवाले, केदार जाधव, रोहित मोटवानी आणि अंकित बावणे यांची निवड झाली आहे. वरिष्ठ गटाच्या निवड समितीने विशाखापट्टणमला झालेल्या बैठकीत टीम्स निवडले. जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू परवेज रसूल याला तीन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आलेले आहे.
बीसीसीआयचे मानद चिटणीस संजय पटेल यांनी या टीम जाहीर केल्या. सेहवाग, गंभीर, झहीर यांना चार दिवसीय सामन्यांसाठी निवडण्यात आले. गंभीर, झहीर यांना गेल्या वर्षी, तर सेहवागला यंदा मार्चमध्ये टेस्ट टीममधून वगळण्यात आले.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, चेतेश्‍वर पुजाराच्या नेतृत्वाखाली भारतीय 'ए' संघ २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत शिमोगा येथे दुसरा, तर ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हुबळी येथे तिसरा चार दिवसीय सामना खेळणार आहे. वन-डे सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने अनुक्रमे १५, १७ आणि १९ सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे खेळले जातील. एकमेव टी-२0 सामना २१ सप्टेंबर रोजी होईल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 12, 2013, 12:22


comments powered by Disqus