मुलाचं दु:ख सहन न झाल्याने सहवागला शतक करावं लागलं, Sehwag keeps promise to his son with a ton

`मुलाचं दु:ख` सहन न झाल्याने सहवागला करावं लागलं `शतक`

`मुलाचं दु:ख` सहन न झाल्याने सहवागला करावं लागलं `शतक`

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

वीरेंद्र सहवागने आयपीएलच्या दुसऱ्या क्वालीफायर सामन्यात किग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतांना चेन्नई सुपरकिंग्जविरोधात 58 चेंडूत 122 रन्स केल्या.

वीरेंद्र सहवागने आपल्या मुलाला प्रॉमिस केलं होतं, ते त्याने अखेर पूर्ण केलं.

आयपीएलमध्ये शानदार शतक केल्यानंतर वीरेंद्र सहवागने सांगितलं की, काही दिवसांआधी मी आपल्या मुलाशी बोलतांना म्हटलं होतं की, येणाऱ्या सामन्यांमध्ये मी चांगल्या धावा करेल.

सहवागने सांगितलं, "एके दिवशी मी माझी पत्नीला फोन केला, पण माझा मुलगा आर्यवीरने फोन घेतला, आर्यवीर मला म्हणाला, बाबा तुम्ही आऊट का होतायत, शाळेत माझे मित्र मला चिडवतात, की तुझे बाबा रनच करत नाहीत, तेव्हा मी आर्यवीरला सांगितलं, मी उर्वरित सामन्यांमध्ये नक्की चांगल्या धावा काढीन".

सहवागने 58 चेंडूत 122 रन्स केल्या आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 31, 2014, 10:02


comments powered by Disqus