‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मधून सेहवाग-हरभजनला डच्चू... , Sehwag not in Champions Trophy probables list

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मधून सेहवाग-हरभजनला डच्चू..

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मधून सेहवाग-हरभजनला डच्चू..
www.24taas.com, मुंबई

इंग्लंडमध्ये ६ जून ते २३ जून दरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’साठी भारतीय टीमच्या ३० संभावित क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आलीय.

संभाव्या क्रिकेटपटूंमध्ये वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि झहीर खानला टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. सेहवागला टीममधून डच्चू दिल्यानं त्याचा ‘गेम ओव्हर’ झाल्याची जोरदार चर्चाही भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे. सेहवाग फॉर्म आणि फिटनेसाठी सध्या झगडताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन टेस्टमधूनही त्याला वगळण्यात आलं होतं.

भज्जीनंही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टसीरिजमध्ये लौकीकाला साजेशी कामगिरी केली नव्हती. झहीर खान दुखापतींनी त्रस्त आहे. त्यामुळेच कदाचित त्याच्यासाठी भारतीय टीमचे दरवाजे बंद करण्यात आले असावेत. टीममध्ये उन्मुक्त चंद, परवेझ रसूल, जलज सक्सेना, सिद्धार्थ कौल, आयसी पांडे आणि केदार जाधव या नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय.

First Published: Saturday, April 6, 2013, 14:59


comments powered by Disqus