Last Updated: Monday, January 7, 2013, 17:45
www.24taas.com, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पीनर शेन वॉर्न आणि वेस्ट इंडिजचा मध्यम फळीतील फलंदाज मार्वन सॅम्युअल यांच्या टी-२० सामन्यादरम्यान हाणामारी झाली.
बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्स फलंदाजी करत असताना डेव्हिड हसी दुसरी धाव घेत असताना सॅम्युअलने त्याला धक्का दिला म्हणून कर्णधार शेन वॉर्न गोलंदाजी करताना सॅम्युअलवर चिडला. सॅम्युअल फलंदाजीसाठी आला तेव्हा वॉर्न त्याच्यावर चिडला आणि त्याला शिव्या दिल्या.
त्यानंतर लगेच दुसऱ्या ओव्हरमध्ये वॉर्नने सॅम्युअलच्या छातीवर बॉल मारला. त्यावर प्रतिक्रिया देत सॅम्युअलने वॉर्नच्या दिशनेने बॅट फेकली. ही बॅट कोणाला लागली नाही. परंतु, झालेल्या प्रकारानंतर दोन्ही पंचानी दोघांना बाजुला केले.
टीव्ही कव्हरेजमध्ये कॉमेंट्रीसाठी माइक घातलेल्या शेन वॉर्नने म्हटले तुमच्या दिशने कोणी बॅट फेकली त्यावेळी तुम्ही काय करणार. या नंतर लसिथ मलिंगाचा चेंडू डोळ्याला लागल्यामुळे सॅम्युअल रिटायर्ड हर्ट झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी शेन वॉर्नवर शिस्त पालन समितीने एक सामन्यांची बंदी घातली आहे.
First Published: Monday, January 7, 2013, 17:43