पवार मुंबईकर झाले, MCA अध्यक्षपदावर डोळा!, Sharad Pawar becomes a Mumbaikar, perhaps with eye on MCA polls

पवार मुंबईकर झाले, MCA अध्यक्षपदावर डोळा!

पवार मुंबईकर झाले, MCA अध्यक्षपदावर डोळा!

www.24taas.com, झी मीडीया, मुंबई
आयसीसी अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता शऱद पवार यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

एमसीएची निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार यांनी अगोदर बारामतीचा पत्ता बदलवून मुंबईचा करून घेतला. आता पवारांनी पारसी पायोनियर क्लबचे चेअरमनपद स्वीकारल आहे.
2011मध्ये एमसीए निवडणुकीत पवारांचा पत्ता बारामतीचा होता. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती. मात्र आता पवारांना पुन्हा एकदा एमसीएची कॅप्टनशिप करायची आहे. त्यामुळेच त्यांनी एमसीएमध्ये आपली फिल्डिंग मजबूत करणं सुरु केली आहे.

त्याचदृष्टीनं त्यांनी अगोदर पत्ता बदलवला आणि त्यानंतर आता पारसी पायोनियर क्लबचे चेअरमनपद स्वीकारलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 18, 2013, 18:51


comments powered by Disqus