आयपीएल सामन्यावर सट्टा, सहा जणांना अटक , Six people arrested in IPL betting

आयपीएल सामन्यावर सट्टा, सहा जणांना अटक

आयपीएल सामन्यावर सट्टा, सहा जणांना अटक
www.24taas.com,फरीदाबाद

आयपीएल सहा सीजन सुरू आहे. क्रिकेटची धूम सुरू असताना आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे सट्टेबाजी होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

हरियाणामधील फरीदाबाद जिल्ह्यात आयपीएल सामन्यावर सट्टा खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी आयपीएल सामन्यावर सट्टा लावण्याच्या कारणावरून सहा जणांना ताब्यात घेतले. एका हॉटेलमधून सहा तरूणांना पोलिसांनी अटक केली.

फरीदाबादमधील सेक्टर १७मधील एकान्त हॉटेलवर छापा मारला. यावेळी चेन्नई सुपर किंग आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात क्रिकेट सामना होता. या सामन्यावर सट्टा लावण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सट्टा खेतळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा मारण्यात आल्याचे पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीच्यावेळी स्पष्ट केले.

First Published: Thursday, April 11, 2013, 15:30


comments powered by Disqus