Last Updated: Wednesday, October 30, 2013, 15:07
www.24taas.com , झी मीडिया, सांगलीएकोणीस वर्षाखालील महिला एकदिवसीय क्रिकेट मॅचमध्ये २२४ रन्स करण्याचा विश्वविक्रम सांगलीतल्या स्मृती मानधनानं केलाय. महाराष्ट्र संघाची कॅप्टन असणाऱ्या स्मृतीनं गुजरात संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केलाय.
स्मृतीनं हा विश्वविक्रम केल्यामुळं तिच्या सांगलीतल्या घरात दिवाळीआधीच दिवाळी साजरी होतेय. सगळ्यांनी मिठाई वाटून आणि फटाके वाजवून आनंद साजरा केला.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्मृती मानधना सांगलीतल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिकतेय. वयाच्या नवव्या वर्षांपासून क्रिकेट खेळते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Wednesday, October 30, 2013, 14:55