Last Updated: Friday, January 24, 2014, 11:55

www.24taas.com, वृत्तसंस्था, हॅमिल्टन
भारतीय क्रिकेट टीमने गुरुवारी हॅमिल्टनमधील दुसरा वनडे सामना न्यूझीलंडबरोबर खेळताना गमावाला. हा भारताचा दुसरा पराभव. मात्र, धोनी सामना हरला तरी एका भारतीयाने चक्क ५२ लाख रूपये जिंकण्याची किमया केली आहे.
दुसऱ्या वनडेच्या दिवशी एका भारतीय व्यक्तीला हा सामना लाभदायक ठरला. त्यामुळे त्यांने भारत हरला असताना आपला आनंद साजरा केला. कारण त्याला ५२ लाख रूपये मिळालेत. त्यांने कोरे एंडरसनने फटकावलेल्या सिक्सची कॅच मैदानाबाहेर एका हाताने घेतली आणि तो ५२ लाख रूपयांचा धनी झाला.
या भारतीय प्रेक्षकाला एक लाख न्यूझीलंड डॉलर बक्षीस म्हणून देण्यात आले. एका जाहिरात कंपनीचे प्रमोशन चालले होते. या कंपनीचा टी शर्ट या भारतीयाने घातला होता. याचवेळी मैदानाबाहेर आलेला चेंडू त्यांने एका हाताने घेतला आणि तो जाहिरात कंपनीचा विजेता ठरला.
पंजाबमधील मुळचा रहिवासी जतिंदर सिंग आहे. त्याने इशांत शर्माच्या बॉलिंगवर कोरे एंडरसनने अपला चौथा छक्का मारला. बॉल हवेत असताना जतिंदरने कॅच पकडली. न्यूझीलंडमध्ये अशी स्पर्धा घेतली जाते. मात्र, या स्पर्धेची अट असते की, कंपनीचा जाहित असलेला टी शर्ट घातलेला असावा आणि एका हाताने कॅच पकडायची.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 24, 2014, 11:55