Last Updated: Thursday, September 13, 2012, 18:35
www.24taas.com, चेन्नईइंडियन प्रीमिअर लीग मधील आर्थिक संकटात सापडलेली टीम डेक्कन चार्जर्सने पीव्हीपी व्हेंचर्सने लावलेली 900 कोटींची रक्कम पुरेसी नसल्याचे कारण देत लिलाव फेटाळला आहे.
गेल्याच आठवडयात वृत्तपत्रामध्ये डेक्कन चार्जर्सच्या लिलावाची जाहिरात देऊन निविदा मागवण्यात आली होती. जाहिरात देऊनही फक्त पीव्हीपी व्हेंचर्स कंपनीने बोली लावली होती.
मात्र टीमची मालक कंपनी डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज या प्रस्तावावर नाखूष होती आणि त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे आता हळूहळू आयपीएलची प्रसिद्धी कमी होत चालली आहे असं वाटतयं
First Published: Thursday, September 13, 2012, 18:35