ग्रॅमी स्मिथ क्रिकेटला अलविदा करणार South Africa captain Graeme Smith announces shock retirement

ग्रॅमी स्मिथ क्रिकेटला अलविदा करणार

ग्रॅमी स्मिथ क्रिकेटला अलविदा करणार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ अलविदा करणार असल्याचं सांगितलं जातंय.

स्मिथ ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूसलँड्स येथे सुरू असलेल्या तिस-या कसोटीनंतर क्रिकेटला अलविदा करणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात अधिक काळ कर्णधारपदी राहण्याचा विक्रम स्मिथच्या नावावर आहे.

ग्रॅमी स्मिथ हा ३३ वर्षीचा आहे. मी अठरा वर्षांचा असताना येथूनच खेळायला सुरूवात केली होती असे सांगत आता याच मैदानावर निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्मिथने सांगितले.

ग्रॅमी स्मिथने त्याच्या कारकिर्दीत ११७ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी तब्बल १०९ सामन्यात त्याने आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 18:57


comments powered by Disqus