Last Updated: Monday, December 30, 2013, 21:41
www.24taas.com, झी मीडिया, डर्बनडर्बन टेस्टमध्ये टीम इंडियाला मानहानीकारक पराभवाला सामोर जाव लागलं आहे. सेकंड इनिंगमध्ये भारतीय टीम इनिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मायदेशात शेर ठरलेले भारतीय बॅट्समन आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर ढेर ठरले.
वन-डे सीरिजप्रमाणे धोनी अँड कंपनीनं टेस्ट सीरिजही गमावली. आफ्रिकेनं दोन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये १-०नं बाजी मारली. दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या ९६ रन्सच्या झुंजार इनिंगच्या जोरावर भारतानं सेकंड इनिंगमध्ये कशीबशी २२३ रन्सपर्यंत मजल मारली आणि आफ्रिकन टीमसमोर विजयासाठी ५९ रन्सचं टार्गेट ठेवलं.
हे आव्हान स्मिथच्या टीमनं अगदी सहज पार केलं. आणि टेस्टमधून निवृत्ती घेणाऱ्या जॅक कॅलिसला विजयी भेट दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 30, 2013, 21:40