दक्षिण आफ्रिकेने जिंकला अंडर १९ वर्ल्ड कप South Africa lifts ICC Under-19 World Cup beating Pak

दक्षिण आफ्रिकेने जिंकला अंडर १९ वर्ल्ड कप

दक्षिण आफ्रिकेने जिंकला अंडर १९ वर्ल्ड कप


www.24taas.com, झी मीडिया, दुबई


पाकिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेने अंडर १९ वर्ल्ड कप जिंकलाय, दक्षिण आफ्रिकेने अंडर १९ स्पर्धेत हा पहिलाच वर्ल्डकप जिंकला आहे.

युवा कॅप्टन एडन मरक्रमची खेळी आणि कॉर्बिन बॉशने केलेली शानदार गोलंदाजी केली. मरक्रम आणि बॉशच्या दमदार खेळीने दक्षिण आफ्रिकेने हा विक्रम नोंदवला.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करतांना दक्षिण आफ्रिकेसमोर १३२ धावांचं आव्हान होतं.

मात्र कॅप्टन एडन मरक्रमने नाबाद ६६ धावा करत, दक्षिण आफ्रिकाने अवघ्या चार विकेट गमावून ४२.१ षटकांत आपलं लक्ष्य गाठलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 1, 2014, 23:34


comments powered by Disqus