स्पॉट फिक्सिंग श्रीसंतसह तीन खेळाडूंना अटक, Sreeshant, 2 other RR players arrested for spot fixing

स्पॉट फिक्सिंग श्रीसंतसह तीन खेळाडूंना अटक

स्पॉट फिक्सिंग श्रीसंतसह तीन खेळाडूंना अटक
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आलीये. फास्ट बॉलर श्रीसंत याला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तर त्याचसोबत राजस्थान रॉयलच्या अंकीत चव्हाण आणि अजित चंडालिया या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

या तिघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकानं अटक केलीये. या तिघा खेळांडूंव्यतिरीक्त सात बुकिंना अटक करण्यात आलीये. तर अन्य दोन बुकी फरार झाले आहेत.

मोहाली आणि मुंबईत काल झालेल्या सामन्यात या खेळाडूंनी फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणानं आयपीएलच्या आयोजकांना मोठा धक्का बसला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 16, 2013, 10:08


comments powered by Disqus