Last Updated: Tuesday, March 25, 2014, 12:20
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीबीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी श्रीनीवासन यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी अजून राजीनामा का दिला नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला फटकारलं आहे.
श्रीनिवासन यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. तर त्यांना राजीनामा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टच देणार आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २७ मार्चला होणार आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज सुनावणी झाली असता कोर्टानं कठोर शब्दांत श्रीनिवासन यांची कानउघाडणी केली. `श्रीनिवासन त्यांच्या खुर्चीला एवढे का चिकटून आहेत? जर तुम्ही स्वत:हून खुर्ची सोडणार नसाल तर आम्हाला तसा आदेश द्यावा लागेल`, असंही कोर्टानं यावेळी सुनावल़ं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 12:20