Last Updated: Tuesday, January 28, 2014, 21:51
www.24taas.com, झी मीडिया,हॅमिल्टनटीम इंडियाचा कर्णधार पराभवावर मोकळेपणाने बोलला आहे, आमच्या टीमने नको त्या चुका, पुन्हा-पुन्हा केल्याने आमचा पराभव झाल्याचं कर्णधार धोनीने म्हटलं आहे.
न्यूझीलंडविरोधात खेळली गेलेली चौथी वनडे मॅचही भारताला गमवावी लागली आहे. यावर धोनी म्हणतो, आम्ही बॅटींग करतांना त्याच चूका केल्या, महत्वाच्या वेळी आम्ही विकेट गमावल्या, हे संपूर्ण मालिकेत असंच सुरू होतं.
शेवटच्या सामन्यात आम्ही २८० धावांचा स्कोर उभा केला. जर आम्ही चांगली बोलिंग केली असती तर सामना आम्ही खिशात घातला असता, असंही धोनीनी म्हटलंय.
धोनी आपल्या वेगवान बोलरवर चांगलाच नाराज दिसून आला. धोनी यावर म्हणाला, सुरूवातीला आमच्या बोलरने चांगल्याचं बॉण्ड्रीज दिल्या.
आम्ही बॅटसमनना खेळण्याची संधी दिली, लगोपाठ शॉर्टपिच बोल टाकले आणि त्यांना रन करणं सोप गेलं. यामुळे आमची सुरूवात चांगली झाली असं वाटत नाही.
स्पिनर्सने सुरूवात चांगली केली होती. मात्र वेगवान गोलंदाजांनी ती फळी तोडली. स्पिनर्सने निर्माण केलेला दबाव त्यांनी वेगवान गोलंदाजीला उत्तर देत तोडून काढला, असंही धोनीने स्पष्ट केलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 21:51