क्रिकेट फॅन्सकडून युवराजच्या घरावर दगडफेक stone pelting on yuvi`s home

क्रिकेट फॅन्सकडून युवराजच्या घरावर दगडफेक

क्रिकेट फॅन्सकडून युवराजच्या घरावर दगडफेक

www.24taas.com, झी मीडिया, चंदीगड

ट्वेण्टी-२० विश्वचषकातील पराभवाचं खापर युवराज सिंहच्या माथी फोडण्यात येत आहे. काही नाराज फॅन्सने युवराज सिंहच्या चंडीगडमधील घरावर दगडफेक केल्याचीही चर्चा आहे.

क्रिकेट फॅन्सने रात्री उशीरापर्यंत युवराज सिंह विरोधात घोषणाबाजी केली. पराभवाने संतप्त झालेल्या लोकांनी भारताच्या पराभवासाठी युवराज जबाबदार असल्याचं सांगितलं.

फॅन्सचा हा अवतार पाहून पोलिसांनी युवराजच्या घराजवळून फॅन्सना हटवलं आणि सुरक्षा वाढवली.

मीरपूरमध्ये रविवारी झालेल्या टी - 20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात युवराजने 21 चेंडूत अवघ्या 11 धावा काढल्या, यामुळे टीम इंडियाला फक्त 130 धावा करता आल्या.

श्रीलंकेने अतिशय आरामात हे लक्ष्य पार केलं आणि वर्ल्ड कप आपल्या खिशात टाकला. श्रीलंकेने 2 ओव्हर्स शिल्लक असतांना 6 विकेटने सामना आपल्या नावे केला. यानंतर मात्र सोशल मीडियावर युवराज सिंह विरोधात फॅन्सचा राग दिसून आला आहे.

कॅन्सरसारख्या आजाराशी लढल्यानंतर युवराज सिंहने 2012 मध्ये टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवलं. युवराज सध्या पुन्हा फॉर्म गवसण्यासाठी संघर्ष करतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 7, 2014, 10:28


comments powered by Disqus