Last Updated: Friday, February 21, 2014, 16:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईयुवराज सिंहचा मस्तीखोरपणा आजही कायम आहे, या आधीही ड्रेसिंग रूममध्ये युवराजने मस्ती केल्याचे अनेक किस्से आहेत.
मात्र यावेळी ट्वीटरवर युवराजने आपल्या टीम मेंबर्सची गंमत केली आहे.
पार्थिव पटेलने गुरूवारी आपल्या ट्वीटरवर जीममधील फोटो लावले, पार्थिवने आपले हे फोटो व्यायामाचे असल्याचं खाली लिहलं. यावर युवराज सिंहने चांगलीच गंमत केली आहे.
या फोटोंखाली युवराजने लिहलं आहे. `जीममधलं हे वजन तू उचलतोय, की वजन तुला उचलतायत`, आजारपणानंतरही युवराजमध्ये नटखटपणा कायम आहे, याचा आनंद युवराजच्या फॅन्सने व्यक्त केला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 21, 2014, 16:34