Last Updated: Thursday, October 25, 2012, 22:31
www.24taas.com, मुंबई सन टीव्ही नेटवर्कनं इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच ‘आयपीएल’च्या हैदराबाद फ्रेंचायजीचा ताबा मिळवलाय.
आयपीएल गव्हर्निंग काऊंन्सिलच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन टीव्ही नेटवर्कनं या नव्या फ्रेंचायजी टीमचे सर्व हक्क प्रतिवर्षी ८५.०५ करोड रुपयांच्या दरानं विकत घेतलेत. त्यामुळे, वार्षिक करारानुसार हैदराबाद टीमचे सर्व हक्क यापुढे सन टीव्हीकडे असणार आहेत.
पीव्हीपी व्हेंचर्सनं हैदराबाद टीमचे हक्क मिळवण्यासाठी तब्बल ६९.०३ करोड मोजण्याची तयारी दर्शवली होती. पण, सन टीव्ही नेटवर्कची बोली त्यांच्यापेक्षा जास्त असल्यानं हैदराबाद टीमचे सर्व अधिकार त्यांच्याकडे सोपवण्यात आले.
First Published: Thursday, October 25, 2012, 22:31