Last Updated: Friday, March 28, 2014, 09:24
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबईबीसीसाआय तसंच आयपीएल स्पर्धेसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपद स्विकारण्याबाबत लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून सुनील गावस्कर यांनी पदभार स्विकारावा असा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी बीसीसीआयसमोर ठेवला होता. यावर विचार करण्यासाठी न्यायालयानं २४ तासाची मुदत दिली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.
न्यायालयानं चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम्सवर बंदी घालण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. या दोन टीम्स स्पर्धेतून आऊट झाल्यास आयपीएलच्या मॅचेसची संख्या ६० वरुन ३४ पर्यंत खाली येईल. प्रक्षेपणाचे हक्क तसंच जाहिरातींवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
या निर्णयाचा आर्थिक फटका अन्य फ्रँचायझींना बसणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आयपीएल स्पर्धा यावर्षासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णयही बीसीसीआय घेऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, March 28, 2014, 09:24