टी-२० वर्ल्डकप: आज भारत वि. ऑस्ट्रेलिया संडे ट्रीटt-20 wold cup - today India vs Australia Match

टी-२० वर्ल्डकप: आज भारत वि. ऑस्ट्रेलिया संडे ट्रीट

टी-२० वर्ल्डकप: आज भारत वि. ऑस्ट्रेलिया संडे ट्रीट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

टी-२० वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही संडे ट्रीट क्रिकेट रसिकांना पाहयला मिळणार आहे. साखळी फेरीतली टीम इंडियाची ही शेवटची लढत आहे. मात्र या लढतीपूर्वीच टीम इंडियाचे सेमी फायनलमधलं स्थान जवळपास निश्चित झालंय.

शिखर धवन आणि युवराज सिंह फॉर्मात नाहीत. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली सातत्यपूर्ण खेळ करतायत. तसंच रवींद्र जाडेजा, आर. अश्विन आणि अमित मिश्रा हे फिरकी त्रिकूटनं स्पर्धेत दहशत निर्माण केलीय.

दुसरीकडं सलग दोन पराभवामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. मात्र आजच्या सामन्यात मोठा विजय मिळवण्याचा कांगारुंचा प्रयत्न असेल. जॉर्ज बेलीच्या टीमनं आपल्या लौकीकाला साजेसा खेळ केला तर धोनी ब्रिगेडला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागू शकतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 30, 2014, 10:36


comments powered by Disqus