Last Updated: Saturday, February 22, 2014, 21:33
www.24taas.com, झी मीडिया, दुबईडिफेंडिंग चॅम्पियन्स भारताच्या अंडर- १९ टीमला वर्ल्ड कपमध्ये क्वार्टर फायनलमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडनं भारतावर अटीतटीच्या लढतीमध्ये तीन विकेट्सने मात केली.
टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर भारतानं दिपक हूडाच्या ६८ रन्स आणि सर्फराझ खानच्या नॉटआऊट ५२ रन्सच्या जोरावर ५० ओव्हर्समध्ये २२१ रन्स केले. भारतान ठेवलेलं २२२ रन्सचं आव्हान इंग्लिश टीमनं ७ विकेट्स गमावून पार केलं. भारतीय टीम डिफेंडिंग चॅम्पियन्स असल्यानं त्यांनाच विजयासाठी अधिक पसंती देण्यात आली होती. मात्र, भारतीय टीमला क्वार्टर फायनलमध्ये एक्झिट घ्यावी लागली.
त्याआधी दीपक हुड्डा आणि सर्फराज खान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर २२२ धावांचे आव्हान ठेवले. साखळीतील तीनही सामने जिंकून गतविजेत्यांच्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारताचे पहिले तीन फलंदाज नऊ रन्सवर बाद झाले. त्यानंतर भारताची ४ बाद २४ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी कर्णधार विजय झोल व हुड्डा यांनी डाव सावरत ८७रन्सची भागिदारी केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 22, 2014, 21:33