Last Updated: Tuesday, December 25, 2012, 12:24
www.24taas.com, मुंबईवनडे क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज टिव्टरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन काय म्हणाला आहे ट्विटरवर.. सचिनने आपल्या भावनांना ट्विटरवर वाट मोकळी करून दिली.
चाहत्यांचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत, `चाहत्यांच्या प्रेमामुळे एकाच वेळी अश्रू आणि हसू` आहे. `वन-डे क्रिकेटच्या आठवणी कायम मनात राहतील`, `चाहत्यांचे मनापासून आभार` `चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं` अशाप्रकारे ट्विट करून सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
वनडे क्रिकेटमधील आठवणी मला पुन्हा ताज्या वाटत आहेत. निवृत्तीबाबत सचिन म्हणाला, आता मी खूषही आहे आणि दु:खीही. माझ्या डोळ्यात आनंद आणि दु:खाचे अश्रू आहेत. मी माझ्या फॅन्सचा कायम आभारी असेन. त्यांनी मला, माझ्या कुटुंबियांना खूप प्रेम दिले.
First Published: Tuesday, December 25, 2012, 12:06