सचिन, वॉर्न पुन्हा लॉर्ड्सवर खेळणार!Tendulkar and Warne to lead teams in Lord`s bicentenary

सचिन, वॉर्न पुन्हा लॉर्ड्सवर खेळणार!

सचिन, वॉर्न  पुन्हा लॉर्ड्सवर खेळणार!
www.24taas.com, वृत्तसंस्था , लंडन

क्रिकेटचा मक्का समजल्या जाणार्‍या लॉर्ड्सच्या २००व्या जन्मदिनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दिग्गज ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकताना ठाकणार आहेत.

गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नवृत्ती जाहीर करणारा सचिन आणि माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न लॉर्ड्सच्या द्विशतकपूर्तीनिमित्त आयोजित एका मॅचमध्ये खेळणार आहेत.

५ जुलै रोजी होणार्‍या ५० ओव्हरच्या या मॅचमध्ये सचिन मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) संघाचं नेतृत्व करणार आहे, तर वॉर्न शेष विश्‍व संघाचा कॅप्टन असेल. एमसीसीच्या टीम ११मध्ये सचिनशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडचा समावेश असणार आहे. सचिननं १९९८ मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या वेल्स मेमोरियल सामन्यात शतक ठोकलं होतं.

एमसीसी संघाचं कर्णधारपद भूषवणं, ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. मी हा प्रस्ताव स्वीकारला आहे, असं सचिननं सांगितलं. तो म्हणाला, लॉर्ड्सवर खेळणे माझ्यासाठी खूपच विशेष असते. मी या विशेष मॅचला विशेष बनवण्यासाठी आणि त्यात खेळण्यासाठी आतुर आहे. २०१० मध्ये मला एमसीसीची मानद आजीवन सदस्यता देण्यात आली होती. त्यामुळं या मैदानावर खेळणं माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. लॉर्ड्सच्या या सेलिब्रेशनचा आपणही एक हिस्सा असणार असल्यामुळं मी आनंदी आहे, असंही तो म्हणाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 7, 2014, 15:29


comments powered by Disqus