Last Updated: Saturday, February 23, 2013, 19:14
www.24taas.com, चेन्नईचेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियानं दुस-या दिवसअखेर 3 विकेट्स गमावून 182 रन्स केले आहेत. सचिन तेंडुलकर 71 रन्सवर आणि विराट कोहली 50 रन्सवर नॉट आऊट आहे. भारतीय टीम कांगारुंच्या अजूनही 198 रन्सनं पिछाडीवर आहे. तीन विकेट्स 105 रन्सवर गमावल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनं भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही.
या दोघांनी नॉट आऊट 77 रन्सची पार्टनरशीप केली. तर चेतेश्वर पुजारा आणि सचिन तेंडुलकरनं केलेली 93 रन्सची पार्टनरशीपही भारताच्या इनिंगमध्ये निर्णायक ठरली. दरम्यान, सचिन तेंडुलकरनं आपल्या टेस्ट करिअरमधील 67 वी तर कोहलीनं 6 वी टेस्ट सेंच्युरी पुर्ण केली.
त्याचप्रमाणे सचिननं मायदेशात 7 हजार रन्सचा टप्पा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध साडेतीन हजाराहून अधिक रन्स केले. कांगारुंकडून जेम्स पॅटिन्सननं तीन विकेट्स घेतल्या. आता टेस्टच्या तिस-य़ा दिवशी सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष असेल.
First Published: Saturday, February 23, 2013, 19:13